कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अतिवेगाने घेतले दोन जिवलगांचे बळी

12:52 PM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुळगाव येथे भीषण अपघात : दोन्ही युवक रेवोडा येथील

Advertisement

डिचोली : व्हाळशी डिचोली येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील डिजल मेकानिक ट्रेडमध्ये शिकणऱ्या रेवोडा बार्देश येथील दोन युवक भरधाव वेगाचा बळी ठरले. आयटीआयमधून रेवोडा येथे जात असताना तांबडारस्ता मुळगाव येथे एक्टिवा स्कुटरला ओव्हरटेक करताना मागाहून हलकीशी धडक बसल्याने ड्युक या मोटरसायकलवरील दोन्ही युवक उसळून पडले आणि जागीच ठार झाले. एक्टिवा स्कुटरचालक किरकोळ जखमी झाला.

Advertisement

दोघेही होते जिवलग मित्र 

हा अपघात काल शुक्र. दि. 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वा. च्या सुमारास घडला. उपलब्ध माहितीनुसार या अपघातात मृत झालेल्या रेवोडा बार्देश येथील ओमकार फडते व तेजस कवठणकर हे दोन्ही युवक एकमेकांचे जिवलग मित्र होते. एकत्रितपणे त्यांनी डिचोलीच्या आयटीआयमध्ये गेल्यावर्षी प्रवेश घेतला होता. आयटीआयमध्ये डिजल मेकानिक या ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेत होते. या ट्रेडच्या अंतिम परिक्षेत ओमकार हा उत्तीर्ण झाला होता. तेजस याचे काही पेपर राहिले होते. ते पेपर सोडविण्यासाठी आवश्यक असलेला अर्ज भरण्यासाठी ओमकार व तेजस हे दोघेही तेजस याच्या ड्युक बाईकवरून डिचोलीत आयटीआयमध्ये आले होते.

आयटीआयमधील आपले काम संपवून ओमकार व तेजस हे दोघेही ड्युक बाईकवरून रेवोडा येथे जाण्यासाठी निघाले होते. ड्युक बाईकवरून इतर गाड्यांना भरधाव वेगाने ओव्हरटेक करून जात असताना तांबडारस्ता मुळगाव येथे रस्त्यावर पुढे चालणाऱ्या एका जीए 03 एयु 7921 या एक्टिवा स्कुटरला मागाहून हलकीशी धडक बसली व त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. हा अपघात इतका जबरदस्त होता की एक्टिवावर धडक बसताच ड्युक बाईकवरील ओमकार व तेजस हे दोघेही मोटरसायकलवरून उसळून बाहेर फेकले गेले. दोघापैकी एक रस्त्याच्या बाजूला पडला. तेथे दगडाला त्याचे डोके आपटल्याने तो जागीच गतप्राण झाला. या जबरदस्त अपघातात या गाडीवरील दुसरा युवक रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटरच्या खालील पाईपमध्ये घुसला. तो प्रथमदर्शनी कोणाच्याही निदर्शनास आला नाही.

अपघातानंतर जमलेल्या लोकांनी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या एका युवकावरच सर्वांचे लक्ष गेले. जमलेले सर्वजण त्याच्यावरच लक्ष केंद्रित करून असताना कोणालातरी गटराच्या पाईपमध्ये घुसलेल्या अन्य युवकाचे पाय दिसले. त्यामुळे गोंधळ उडाला आत घुसलेल्या युवकाला जमलेल्या लोकांनी ओढून बाहेर काढले. बाहेर काढून त्याची पडताळणी केली असता त्याचाही जीव गेल्याचे समजले. या घटनेची माहिती डिचोली पोलीस तसेच 108 रूग्णवाहिकेला देताच रूग्णवाहिका दाखल झाली. रूग्णवाहिकेतील वैद्यकीय कर्मचाऱ्याने तपासून डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article