For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन्ही जिल्हा पंचायतींवर पुन्हा भाजपचाच झेंडा

01:27 PM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
दोन्ही जिल्हा पंचायतींवर पुन्हा भाजपचाच झेंडा
Advertisement

प्रदेश भाजपाध्यक्ष दामू नाईक यांचा विश्वास : बार्देशातील चार उमेदवारांनी भरले अर्ज

Advertisement

म्हापसा : जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भाजपने 40 मतदारसंघांत आपले उमेदवार उतरवले आहेत. 7 जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यात येणार असून 3 जागा मगोसाठी देण्यात आल्या आहेत. चाळीसही मतदारसंघांत भाजप पूर्ण ताकदीनिशी विजय प्राप्त करील. दोन्ही जिल्हा पंचायतींवर पुन्हा भाजपचाच झेंडा फडकणार आहे, असा विश्वास भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हापसा येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. श्रीदेव बोडगेश्वराचा आशीर्वाद घेऊन गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर नाईक पत्रकारांसमोर बाsलत होते.

नाईक म्हणाले की, रेईश मागूस, पेन्ह द फ्रान्स, सुकूर, कळंगुट या चार मतदारसंघांतील उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. जनतेने भाजपच्या कमळावर शिक्का मारून संदीप साळगावकर, रेश्मा बांदोडकर, अमित अस्नोडकर, रिंजेलीया रॉड्रिगीस यांना विजयी करावे. अर्ज भरताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक, आमदार मायकल लोबो तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेल्या योजनांपासून ते आजपर्यंतच्या माझे घर योजनेपर्यंतच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोचवून आम्ही विजयी होणार आहेत. जनतेने यापूर्वी आम्हाला साथ दिली आहे, आजही देणार आणि उद्याही जनतेची आम्हाला साथ मिळेल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.

Advertisement

स्वच्छ, प्रसन्न, प्रामाणिक, धमक असलेले उमेदवार

भाजपने जे उमेदवार दिले आहेत ते सर्व नवीन चेहरे आहेत. त्यांच्यावर कसलेही डाग नाहीत. प्रसन्न चेहऱ्यांचे युवा आहेत. त्यांच्यात प्रामाणिकपणे काम करण्याची धमक आहे. यापूर्वीच्या जिल्हा पंचायत सदस्यांनी केलेले काम हे उमेदवार पुढे घेऊन जाणार आहेत. विजयाची खात्री 100 टक्के आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील ही निवडणूक आम्ही जिंकणार असून दोन्ही जिल्हा पंचायतींवर पुन्हा भाजपचाच झेंडा फडकेल, असेही दामू नाईक म्हणाले.

आमदार मायकल लोबो म्हणाले की, देव बोडगेश्वराचा आशीर्वाद आणि मुख्यमंत्र्यांनी जो विकास साधलाय, त्या आधारे आमचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील. आमदार केदार नाईक म्हणाले, आमच्या सर्व उमेदवारांना कसे आम्ही निवडून आणणार यासाठी आम्ही जोर लावला आहे. आम्ही तिघा आमदारांनी मिळून सर्व उमेदवारांना भरघोस आघाडी मिळवून ही निवडणूक जिंकण्याची रणनीती आखली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, पंतप्रधानांचे विकसित भारत स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याला  विकसित करण्यासाठी आता डबल नंतर ट्रिपल इंजिन करण्यासाठी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत. जनता भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement
Tags :

.