कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli : कापरी येथे ऊस तोडीदरम्यान सापडली बिबट्याचे दोन बछडे !

02:40 PM Nov 27, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

       कापरी शेतात बिबट्याची पिल्ले आढळली

Advertisement

शिराळा : कापरी (ता. शिराळा) येथील शिवाजी बाळा पाटील यांच्या शेतात ऊस तोडीच्या दरम्यान दोन बिबट्यांची पंधरा ते वीस दिवस वयाचे दोन बछडे आढळून आली. सदर बिबट्याचे बछडे वनविभाग व सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स च्या पथकामुळे आईच्या कुशीत पुन्हा विसावली.

Advertisement

बुधवारी सकाळी शिवाजी पाटील यांच्या शेतामध्ये ऊसतोड सुरु होती. यावेळी दोन पंधरा ते वीस दिवसांची बिबट्याची दोन पिल्ले दिसून आली. वनकर्मचाऱ्यांनी दोन्ही पिल्ले सुरक्षितस्थळी ठेवले. संपूर्ण ऊसतोड बंद करण्यात आली. जेणेकरून पिल्लांची आई पिल्लांना सुखरूप ठिकाणी घेऊन जाईल.

यावेळी बिबट्याची हालचाल टिपण्यासाठी तीन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. पिल्ले ठेवल्यानंतर म्हणजे साधारण साडेबारा वाजता पिल्लाच्या आईने दोन्ही पिलांना घेवून तेथून धूम ठोकली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaAnimal Rescue OperationLeopard Cubs FoundLeopard Mother ReunionRescue WarriorsSugarcane Field RescueTrap Camera MonitoringWildlife ConservationWildlife Department Maharashtra
Next Article