महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लष्कर-ए-तोयबाच्या दोघांना शस्त्रांसह अटक

06:00 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रीनगरमध्ये संयुक्त पथकाची कारवाई

Advertisement

► वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दोन दहशतवाद्यांना बुधवारी श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून संशयित दहशतवाद्यांवर कारवाई केली. श्रीनगर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या संयुक्त पथकाने महामार्ग बायपासवर एक मजबूत चेक पोस्ट उभारून तपासणी करत असताना परिमपोराकडून जेके 09 ए 2788 क्रमांकाची एक पांढऱ्या रंगाची सँट्रो कार येताना दिसली. यावेळी चेकपोस्टवरील पोलीस पथकाला पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकातील जवानांनी पाठलाग करत संबंधितांना जाळ्यात अडकवले.

दहशतवाद्यांचे दोन साथीदार मुमताज अहमद लोन आणि जहांगीर अहमद लोन यांना घटनास्थळी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, चार मॅगझिन, दोन फिलर मॅगझिन आणि आठ ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत दोघांवरही बटमालू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article