महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन लाख महिलांना मातृवंदनाचा लाभ

10:41 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोषण आहारासाठी प्रोत्साहन धन : महिला-बाल कल्याण खात्याची माहिती

Advertisement

बेळगाव : गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राबविण्यात आलेल्या मातृवंदना योजनेंतर्गत आतापर्यंत 2 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांपर्यंत ही योजना पोहोचली आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याने दिली आहे. 2017 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे महिलांसाठी ही योजना सफल होऊ लागली आहे. गर्भवती महिला आणि बालकांचे कुपोषण दूर व्हावे यासाठी ही योजना अधिक पारदर्शकपणे राबविली जात आहे. गर्भवती महिलांना त्यांच्या पालन पोषणासाठी तीन टप्प्यात पाच हजार रुपये दिले जातात.

Advertisement

पहिल्या अपत्यासाठी पाच हजार तर दुसऱ्या अपत्यासाठी (मुलगी) 6 हजार रुपये प्रोत्साहन धन दिले जात आहे. विशेषत: ग्रामीण भागात ही योजना अधिक सुरळीतपणे सुरू आहे. शिवाय याबाबत अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, आरोग्य साहाय्यक कार्य करू लागले आहेत. प्रसूती झाल्यानंतर पोषक आहार उपलब्ध व्हावा यासाठी ही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते. विशेषत: ग्रामीण भागात शारीरिक क्षमता नसतानाही प्रसूतीनंतर मोलमजुरी करावी लागते. अशा परिस्थितीत पोषक आहारासाठी म्हणून ही रक्कम दिली जाते.

दुसऱ्या अपत्यालाही मिळणार मातृवंदनाचा लाभ 

या योजनेंतर्गत पहिल्या अपत्याला आर्थिक साहाय्य म्हणून दिले जात आहे. त्याबरोबरच दुसऱ्या अपत्यालाही मातृवंदना योजनेंतर्गत साहाय्यधन मिळत आहे. यासाठी दुसरे अपत्य मुलगी असणे मात्र आवश्यक आहे. याविषयी अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

योजनेचे लाखो लाभार्थी

महिला आणि बालकांतील कुपोषितता दूर करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. प्रसूती काळात चांगला आहार उपलब्ध व्हावा यासाठी पहिल्या अपत्याला पाच तर दुसऱ्या अपत्याला सहा हजार रुपये प्रोत्साहन धन दिले जाते. आतापर्यंत लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.

- आण्णाप्पा हेगडे (कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण खाते)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article