महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लक्झरी बस अपघातात गुजरातमध्ये दोन ठार

06:12 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

30 जण  जखमी, 65 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

Advertisement

वृत्तसंस्था/ डांग

Advertisement

गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ सापुतारा येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. सुरतहून येणारी लक्झरी बस सापुतारा घाटाजवळ दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. लक्झरी बसमध्ये सुमारे 65 ते 70 प्रवासी असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला.

एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या टेम्पोला टाळण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर अनियंत्रित बस सुरक्षा भिंतीला धडकून दरीत कोसळली. ही घटना सापुतारा-मालेगाव राष्ट्रीय महामार्ग घाटावर सापुताऱ्यापासून दोन किमी अंतरावर घडली.

अपघातग्रस्त लक्झरी बस रविवारी पहाटे सुरत चौक बाजार येथून पर्यटकांना घेऊन सापुतारासाठी निघाली होती. पर्यटन सफर आटोपून सायंकाळच्या सुमारास सुरतच्या दिशेने परतत असताना बसला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सापुतारा पोलीस व 108 पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. सापुताराला भेट देऊन पर्यटक सुरतला परतत होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article