महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यमनापूरजवळील अपघातात दोघे ठार

11:29 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरले : कारचालकही किरकोळ जखमी

Advertisement

बेळगाव : भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमनापूरजवळ रविवारी रात्री सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कारचालकही किरकोळ जखमी झाला आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. प्रवीण बाळाप्पा वण्णूर (वय 32) रा. होसूर, ता. सौंदत्ती, जगदीश अडव्याप्पा कुरबर (वय 43) रा. देवलत्ती, ता. खानापूर अशी त्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. ते दोघेही बेळगाव येथील खासगी इस्पितळाचे कर्मचारी होते. मोटारसायकलवरून जाताना भरधाव कारची धडक बसून प्रवीण व जगदीश दोघे गंभीर जखमी झाले.

Advertisement

त्यांना तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. सोमवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. कारचालक आप्पय्या बसय्या हिरेमठ (वय 27) रा. हिरेहट्टीहोळी हाही किरकोळ जखमी झाला आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article