For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूरजवळील अपघातात दोघे ठार

01:15 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूरजवळील अपघातात दोघे ठार
Advertisement

टायर फुटल्याने कारची दुचाकीला धडक

Advertisement

वार्ताहर /नंदगड

बेळगाव-पणजी महामार्गावर खानापूर आयटीआय कॉलेजजवळ एक्सयुव्ही 500 कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि कारमधील अशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजता घडली आहे. घटनास्थळी खानापूर पोलीस तसेच नागरिकांनी धाव घेऊन जखमींना दवाखान्यात हलवण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत माहिती अशी की, लोंढा-बेळगाव महामार्गावर खानापूरजवळील आयटीआय कॉलेजजवळ लोंढ्याहून बेळगावकडे निघालेल्या एक्सयुव्ही कारचा मागील टायर फुटल्याने यावेळी महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला ठोकर दिल्याने दुचाकीस्वार रमेश अशोक पाटील (वय 30) राहणार भेंडवाड ता. रायबाग हा जागीच ठार झाला. तर रस्त्याच्या कडेला चारचाकी जाऊन पलटी झाल्याने यामधील समीन पिरजादे (वय 27) हा गंभीर जखमी झाला होता.   गंभीर जखमीला बेळगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. खानापूर शहरातून रमेश अशोक पाटील भेंडवाड ता. रायबाग हे आपले काम संपवून खानापूर बायपास रोड ते हायवेवरून आपल्या के. ए. 23 इपी 2837 या दुचाकीवरून बेळगावकडे जात होते. याचवेळी गोव्याहून बेळगावकडे जात असलेली एक्सूव्ही 500 ही कार भरधाव निघाली होती. खानापूर आयटीआय कॉलेजजवळ येताच केए 25 एमसी 6970 या चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने डाव्या बाजूने जात असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रमेश अशोक पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर एक्सूव्ही 500 हे वाहन शंभर मीटर दूरवर जावून पलटी होऊन पडले. या एस्कूव्हीचा चालक समीन पिरजादे (वय 27) राहणार बेळगाव हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी बेळगावला नेत असताना त्याचा मृत्यू झाला. एस्कूव्हीतील अन्य अमीद निजामी, साहील उच्चाद,  डॅनियल शेख, जॉन केव्हीन, सुरज हमगिरे, नबिल पिरजादे हे सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Advertisement

मृत दुचाकीस्वार रायबाग तालुक्यातील

या अपघातात मृत्यू पावलेला दुचाकीस्वार रायबाग तालुक्यातील भेंडवाड येथील रहिवासी असून तो सगुना फुड्समध्ये एक्झुकेटीव्ह टेक्निकल म्हणून काम पहात होता. खानापूर परिसरातील काम आटोपून तो बेळगावकडे चालला होता. रमेश पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. यावेळी हा अपघात घडला. या अपघाताचे स्वरुप इतके भयानक होते. दुचाकीही उडून रस्त्याच्या पलीकडे जावून पडली होती. तर चारचाकी रस्त्यापासून दूरवर जावून पलटी झाली होती. यावेळी चारचाकीतील सहाजण दरवाजा उघडल्याने बाहेर फेकले गेले होते. तर एकजण रस्त्याच्या बाजूला असलेल्या चरीत पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला बेळगावला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून खानापूर पोलिसानी तातडीने घटनास्थळी भेट देवून जखमींना हलवण्यासाठी मदत केली. खानापूर पोलीस पीएसआय गिरीश एम. एम. बी. बिरादार, एएसआय ए. वाय. चन्नबसापन्नावर आदींनी घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement
Tags :

.