हिंडगाव फाट्यानजीक अपघातात दोन ठार
मृत तऊण मोदगा,पंतबाळेकुंद्रीतील : आंबोलीला पर्यटनासाठी जाताना दुचाकीची टेम्पोला धडक
चंदगड : बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर हिंडगाव फाटा ते गवसे फाटा दरम्यानच्या वळणावर मोटारसायकल-टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकलवरील मलिक खतालसाब मुजावर (वय 22, रा. मोदगा, ता. बेळगाव) व दौलत खतालसाब मोमीन (वय 22, रा. पंतबाळेकुंद्री, ता. बेळगाव) हे ठार झाले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. कानूर बुद्रुक येथून सिमेंटची पोती उतरून चालक मनोहर शिवाप्पा शिवारे हे टेम्पो गडहिंग्लजच्या दिशेने घेऊन जात होते. गवसे-हिंडगाव फाटा दरम्यानच्या वळणावर बेळगावहून आंबोलीच्या दिशेने मोटारसायकलवऊन मलिक मुजावर व दौलत मोमीन हे दोघे मित्र जात होते. अचानक मोटारसायकलवरील मलिकचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या टेम्पोला समोरासमोर धडक बसली. या धडकेत मलिक जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला दौलत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बेळगाव येथील ऊग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. चंदगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. चंदगड ग्रामीण ऊग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तपास पोलीस हवालदार रवी देसाई करीत आहेत.
मोदगा, पंतबाळेकुंद्री गावावर शोककळा
सांबरा : चंदगड तालुक्यातील हिंदगाव फाटा नजिक झालेल्या अपघातात मोदगा येथील मलिक मुजावर व पंतबाळेकुंद्री येथील दौलत मोमीन यांचा मृत्यू झाल्याने दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. मलिक मुजावर हा कार मेकॅनिक होता. त्याच्या पश्चात लहान भाऊ असा परिवार आहे. तो घरचा कर्ता होता. त्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दौलत मोमीन हा रिक्षा ड्रायव्हर होता. त्याचे वडील केएसआरटीसीमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.सोमवारी त्यांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली. मंगळवारी ते दोघेही अन्य मित्रासोबत दुचाकीवरून आंबोली पर्यटनासाठी निघाले होते. मात्र आंबोलीला पोहोचण्यापूर्वीच अपघात झाला. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे ग्रामस्थातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.