For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगाव, कोलवा येथे अपघातात दोन ठार

06:03 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
मडगाव  कोलवा येथे अपघातात दोन ठार
Advertisement

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisement

मडगाव व कोलवा येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांना मृत्यू येण्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

मडगावच्या अपघातात मोरपिर्ला- केपे येथील कुप्रो वेळीप (वय 55) हे ठार झाले तर कोलवा येथील अपघातात सेलस्टस क्लेफ फर्नांडिस हा 19 वर्षीय युवक जागीच ठार झाला.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीपक पांडू गावकर हा 31 वर्षीय युवा चालक मालवाहू वाहन चालवत होता. कदंब बस स्थानकाच्या दिशेहून हा चालक घाऊक मासळी बाजाराकडे येत असताना अचानक या चालकाला झोप लागली आणि त्याचा पाय ब्रेकच्या ऐवजी अॅक्सेलेटरवर पडला.

त्यामुळे मालवाहू वाहनाची धडक बाजूला पार्क करुन ठेवलेल्या इतर वाहनांना बसली. कुप्रो वेळीप हा चालकाच्या बाजूला बसला हाता. अचानक या मालवाहू वाहनाची धडक बसल्यामुळे वेळीप याचा हात कापला गेला. तद्नंतर हे मालवाहू वाहन दुसऱ्या एक-दोन पार्क करुन ठेवलेल्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने तेथेच अडकले.

पहाटे 3 ते 4 या दरम्यान झालेल्या या अपघाताच्या आवाजाने काही स्थानिक लोक घटनास्थळी आले त्यांनी आत अडकलेल्या चालक गावकर व वेळीप यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांच्या या प्रयत्नाला यश येऊ शकले नाही.

शेवटी मडगावच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दरवाजा कापून आत अडकलेल्या दोघांना बाहेर काढले व इस्पितळात नेण्यात आले. मात्र कुप्रो वेळीप यांना मृतावस्थेत आणले असे तेथील डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली.

दीपक पांडू गावकर हा 31 वर्षीय खोतीगाव -काणकोण येथील मालवाहू वाहनाचा चालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी इस्पितळात उपचार चालू असल्याची माहिती पोलिसानी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक गावकर याच्याविरुद्ध उपचारानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

घाऊक मासळी मार्केटजवळून मोठमोठी अवजड वाहने ये-जा करीत असल्यामुळे धोका टळलेला नसल्याचे स्थानिकांचे मत आहे.

कोलवा अपघातात युवक ठार

गवंडळी -कोलवा येथे झालेल्या दुसऱ्या एका अपघातात वासवाडो- बाणावली येथील सेलस्टस क्ले फर्नांडिस हा 19 वर्षीय युवक जागीच ठार झाला.

हा युवक विवाहाच्या एका स्वागत सोहळ्याला उपस्थित राहून मध्यरात्रीनंतर परतत होता. भरवेगात असलेल्या या युवकाचा दुचाकीवरील ताबा गेला आणि दुचाकी एका जागी आदळून हा युवक जागीच ठार झाला. दुचाकीची झाडाला जबरदस्त धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी

Advertisement
Tags :

.