कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘स्पीड’, ‘इयर फोन’मुळे दोन बळी

03:51 PM Jul 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वास्कोत अतिवेगामुळे एकाचा मृत्यू, दुसरा जखमी : ‘इयर फोन’वर बोलत रेल्वे मार्गावर आल्याने ठार

Advertisement

वास्को : वास्कोत बेदरकारपणे दुचाकी हाकल्याने झालेल्या स्वयं अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या अपघातात सांकवाळ येथे कानाला इयर फोन लावून आपल्याच धुंदीत बोलत रेलमार्गावरून चालणाऱ्या युवकाला रेल्वेची धडक बसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. मुरगाव बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपूल महामार्गावर बेदरकारपणे वाहन हाकल्याने झालेल्या स्वयं अपघातात चालक जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. मयत चालकाचे नाव सत्यम पटेल (23) असे आहे. जखमीचे नाव सर्वेश पटेल (19) असे आहे. मूळ उत्तर प्रदेशमधील हे दोघे सध्या नवेवाडे वास्को भागात राहात होते.

Advertisement

अतिवेगामुळे गेले नियंत्रण

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात मुरगाव बंदराच्या गेट क्रमांक नऊजवळ घडला. स्कूटरचालक सत्यम पटेल व मागे बसलेला त्याचा सहकारी सर्वेश पटेल हे दोघेही बायणा ते मुरगाव बंदर या महामार्गावरून भरधाव वेगात बंदराच्या दिशेने जात होते. अतीवेगामुळे चालकाचे स्कूटरवरील नियंत्रण गेले व दोघेही खाली कोसळले. दोघांनाही चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता चालकाला मृत घोषित करण्यात आले, तर गंभीर झालेल्या सर्वेश याला गोमेकॉमध्ये हलवण्यात आले. मुरगाव पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सूरज नाईक या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

इयर फोनमुळे गमावला जीव

कानाला इयर फोन लावून आपल्याच धुंदीत रेल्वेमार्गावरून चालणाऱ्या युवकाला नाहक आपला जीव गमवावा लागला. रेल्वेची धडधड त्याला ऐकूच आली नाही आणि रेल्वेने त्याला उडवले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास सांकवाळ ते कासावली दरम्यानच्या रेल्वेमार्गावर घडली. मयत युवकाचे नाव अरूण होरो (23) असे असून तो मूळ झारखंड राज्यातील आहे.

फोनवर बोलत रेल्वेमार्गावर

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत युवकाला रेल्वेने धडक दिल्याने तो फेकला गेला व जागीच ठार झाला. मयत युवक फोनवर बोलत रेल्वेमार्गाच्या मध्यभागावरून चालत जात होता. त्याने आपल्या दोन्ही कानांमध्ये इयर फोन घातले होते. त्यामुळे त्याला रेल्वेची धडधड शेवटपर्यंत ऐकूच आली नाही. त्यामुळे त्याचा जीव गमवावा लागला. या अपघाताची माहिती वास्को रेल्वे स्थानक उपव्यवस्थापकाने वास्कोतील रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा व पुढील सोपस्कर केले. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे.

कुंडईत भीषण अपघात, पण जीवीत हानी टळली

मानसवाडा-कुंडई येथे चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीचालक जखमी झाल्याची घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोन प्रवासी बस दुतर्फा आपल्या प्रवाशांना घेण्यासाठी थांबल्या असताना त्याच्या मधोमध वाट काढणाऱ्या ट्रकची निसटती धडक बसली. या धडकेत समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराची दुचाकी ट्रकवर आपटली. प्रसंगावधान साधून चालकाने वाहनावरून उडी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. किरकोळ जखमांवर सुखरूप बचावला. म्हार्दोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसवाडा येथील धोकादायक जंक्शनवर प्रवासी घेण्यासाठी पणजी मार्गे जाणारी तसेच फोंडामार्गे येणारी बस थांबली होती. याचवेळी भोमहून येणारा ट्रक दोन्ही बसच्या मधून घुसला. मात्र पुढून येणारी दुचाकीची धडक ट्रकला बसली. अशा या विचित्र, भीषण अपघातात चार वाहनांची बरीच नुकसानी झाली. सुदैवानी जिवितहानी टळली, दुचाकीचालक किरकोळ जखमांवर सुखरूप बचावला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article