भरतेशचे दोन ज्युडोपटू युनिव्हर्सिटी ब्ल्यू
बेळगाव : जिल्हा पंचायत व पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत भरतेश कॉलेजच्या खेळाडूंनी 2 सुवर्ण, 1 रौप्यपदक मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे. मराठा मंडळ इंजिनिअरींग कॉलेजच्या सभागृहात घेण्यात आलेल्या आरसीयू ज्युडो स्पर्धेत भरतेश कॉलेजच्या खेळाडूंनी भाग घेतला. त्यामध्ये 90 किलो गटात बी. एस. रोहनने सुवर्णपदक, 60 किलो गटात साई पाटीलने सुवर्णपदक, सुमंत पाटीलने 66 किलो गटात रौप्यपदक तर सर्वेश पाटीलने 60 किलो आतील गटात चौथा क्रमांक पटकावित यश संपादन केले आहे. बी. एस. रोहन व साई पाटील यांनी ज्युडो प्रकारात युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा मानाचा किताब पटकाविला असून त्यांची साऊथ झोन आंतर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड झाली असून भोपाळ येथे होणाऱ्या विभागीय युनिव्हर्सिटी स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धकांना संस्थेचे चेअरमन हिराचंद कडीमनी, प्राचार्य निता गंगरेड्डी, क्रीडा निर्देशक प्रदीप जुवेकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.