Solapur Crime : दिवसा घरफोडी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद...!
04:48 PM Oct 19, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
सोलापुरात घरफोडीप्रकरणी दोन सराईत चोरटे अटकेत
Advertisement
सोलापूर : शहरातील विजापूर रोड व विशाल नगर परिसरात नवरात्र काळात घडलेल्या दोन दिवसा घरफोडीच्या घटनांचा तपास अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत शहर गुन्हे शाखेने दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासात आरोपी सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने (रा. चिंचवड, पुणे) व राम उर्फ रामजाने क्षीरसागर (रा. वाघोली, धाराशिव) यांना अटक करून त्यांच्याकडून ₹3.15 लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
Advertisement
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Advertisement