महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुकेकुळण धारगळ अपघातात दोघे जखमी

12:29 PM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुचाकी-चारचाकीची समोरासमोर धडक

Advertisement

पेडणे : धारगळ ग्रामपंचायत क्षेत्रातील सुकेकुळण येथे मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाजवळ शनिवारी संध्याकाळी दुचाकी आणि चारचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हे दोघे महाराष्ट्रातील वेंगुर्ले येथील असून त्यांना उपचारासाठी उत्तर गोवा म्हापसा येथील आझिलो इस्पितळ दाखल करण्यात आले. याबाबत प्राप्त माहितीनुसार, दुचाकीस्वार एमएच 07 एपी 5643 ही दुचाकीवरून सुकेकुळण येथून मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळावर कामासाठी जात होते. तर चारचाकी (जीए 03 व्ही 0585) ही रेंट अ कार मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळावरून भाडे घेऊन जाताना सुकेकुळण येथे रेल्वे पुलाजवळ महामार्गावर समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ओव्हर टेक करण्याच्या नादात धडकली. चारचाकी दुचाकीला दुचाकीस्वार सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले येथील असून दोघेही मोपा विमानतळावर कामाला आहेत. दुचाकी चालक रामचंद्र मल्हार (23) आणि अशोक (24) हे दोघे गंभीर जखमी झाले. चारचाकी ही रेंट अ कार निकिता अगरवाल (25) नामक महिला चालवत होती. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. पेडणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा करून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. या ठिकाणी अनेकवेळा अपघात घडतात काही महिन्यांपूर्वी अपघातात एकाचा बळी गेला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article