महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

06:11 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा कट फसला

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत लष्कराकडून परिसरात शोधमोहीम सुरू होती. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लष्कराने घटनास्थळावरून 2 एके सीरीज रायफल, 6 पिस्तूल आणि 4 चिनी हँडग्रेनेड जप्त केले आहेत.

खराब दृश्यता आणि हवामानाचा फायदा घेऊन दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. सैनिकांनी नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याचे लष्कराने सांगितले.

हिवाळ्याच्या काळात, बर्फवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे, दहशतवादी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या कठीण परिस्थितीतही भारतीय जवान सीमेवर सतर्क राहतात आणि अशा घुसखोरीला हाणून पाडतात. ऑक्टोबर महिन्यातदेखील सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाईत उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. यादरम्यान सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article