ऑस्ट्रेलियन युवा संघामध्ये दोन भारतीयांचा समावेश
वृत्तसंस्था/मेलबर्न
नामीबिया आणि झिम्बाब्वे यांच्या संयुक्त यजमानपदाने 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या पुरूषांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या 15 जणांच्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये दोन भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. आर्यन शर्मा आणि जॉन जेम्स या दोन भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियन युवा संघात संधी देण्यात आली आहे. आर्यन शर्मा हा उपयुक्त फलंदाज आणि फिरकी गोलंदाज आहे. जॉन जेम्स हा वेगवान गोलंदाजी करत असून तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया युवा संघातील कसोटी आणि वनडे सामन्यात आर्यन शर्मा आणि जॉन जेम्स यांचा ऑस्टेलियन युवा संघात समावेश होता. ऑस्ट्रेलियन युवा संघाचे नेतृत्व ऑलिव्हर पीककडे सोपविण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियन यू-19 संघ : ऑलिव्हर पीक (कर्णधार), कॅसे बार्टन, नादेन कुरे, जायडेन ड्रेपर, बेन गॉर्डन, स्टिव्हन होगन, थॉमस होगन, जॉन जेम्स, चार्ल्स लॅचमंड, व्हिल मॅलाझूक, नितेश सॅम्युअल, हेडन शिलर, आर्यन शर्मा, विलियम टेलर आणि अॅलेक्स ली यंग.