कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राऊडी शिटरच्या हल्ल्यात उपनिरीक्षकासह दोघे जखमी

10:58 AM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार : वृद्धेवर अत्याचार आणि दरोड्याचा प्रयत्न केलेल्या राऊडी शिटरवर पोलिसांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी दांडेली जवळच्या जंगलात घडली आहे. राऊडी शिटरने केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. राऊडी शिटर व जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दांडेली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊडी शिटरचे नाव फैरोज यासीन यरगट्टी (वय 23 रा. बैलपार दांडेली) असे आहे. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, गेल्या 12 तारखेला दुपारच्या वेळी घरी एकटीच राहणारी 60 वर्षीय महिला आपल्या नातेवाईकांकडे निघाली होती.

Advertisement

त्यावेळी फैरोजने व़ृद्धेला चाकूचा धाक दाखवून उचलून नेले आणि तिच्याकडील ऐवज लुटला. पीडित महिलेने अज्ञाताच्या विरोधात दांडेली शहर पोलिसात रितसर तक्रार दाखल केली होती. तपासाच्या गतीची चव्रे वेगाने फिरविलेल्या पोलिसांनी  सुमारे 100 संशयितांचे फोटो पीडित महिलेला दाखविले. त्यावेळी  महिलेने फैरोजची ओळख पटविली. दांडेलीचे डीवायएसपी शिवानंद मदरखंडी यांच्या नेतृत्वाखाली फैरोजला ताब्यात घेण्यासाठी दांडेली, हल्याळ व जोयडा पोलिसांचा समावेश असलेल्या तीन-चार पथकांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस विश्वसनीय सुत्रांकडून फैरोज याचा दांडेली, यल्लापूर रत्यावरील कुळगी येथे वावर असल्याचे शनिवारी समजले.

Advertisement

दांडेली नगर पोलीस ठाण्याचे क्राईम पीएसआय किरण पाटील,कर्मचारी इम्रान आणि कृष्णाप्पा आरोपीला ताब्यात घेण्यासाठी कुळगी येथे दाखल झाले. आरोपी जंगलात पळून गेला. पोलीस आपणाला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे लक्षात येताच फैरोज जंगलात पळून गेला आणि ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इम्रान आणि कृष्णप्पा यांच्यावर दगडांनी आणि टोण्याने हल्ला चढवून त्यांना जखमी केले. फैरोजने इम्रान यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यावेळी किरण पाटील यांनी फैरोजला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही चाकू चालविला.

चाकूचा हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात पाटील यांच्या हाताला आणि पायाला जखम झाली आहे. त्यावेळी फैरोजने पुन्हा जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला परिस्थितीची गरज ओळखून पाटील यांनी पळून जाणाऱ्या फैरोजला इशारा देण्यासाठी फायरिंग केली. पण फैरोजने दाद दिली नाही. शेवटी पाटील यांनी  फैरोज याच्यावर गोळी चालविली. फैरोज सराईत गुन्हेगार जखमी झालेल्या पीएसआयसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आणि फैरोजला उपचारासाठी दांडेलीच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फैरोज हा सराईत गुन्हेगार असल्याचे कळते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article