भारत-जर्मनी यांच्यात दोन हॉकी सामने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि जर्मनी पुरुष हॉकी संघामध्ये दोन सामन्यांची हॉकी कसोटी मालिका खेळवली जाणार असून या मालिकेसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. बचावफळीतील वरुण कुमारचे संघात पुनरागमन झाले आहे. उभय संघातील हे दोन सामने 23 आणि 24 ऑक्टोबरला खेळविले जाणार आहेत.
या मालिकेसाठी भारतीय हॉकी संघाचे रविवारी दुपारी बेंगळूरमध्ये आगमन झाले आहे. हरमनप्रित सिंगकडे संघाचे नेतृत्व राहणार असून विवेकसागर प्रसाद उपकर्णधार राहिल. मध्य फळीत खेळणारा हार्दिक सिंग दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. राजिंदर सिंग आणि आदित्य लगाटे हे युवा हॉकीपटू या कसोटी मालिकेत आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील. उभय संघामध्ये ही द्विपक्षिय हॉकी कसोटी मालिका खेळवली जात आहे. कृष्णन बहाद्दुर पाठक आणि सुरज करकेरा यांच्यावर गोलरक्षणाची जबाबदारी राहिल. जर्मनप्रित सिंग, अमित रोहिदास, विष्णूकांत सिंग, मनदीप सिंग हे बचावफळी सांभाळतील. सुमीत निलम, संजीब जेस, मनप्रित सिंग, विवेकसागर प्रसाद, निलकांत शर्मा, शमसेर सिंग, मोहम्मद मुसेन, राजिंदर सिंग, मनदीप सिंग मध्यफळी सांभाळतील. मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग आदीत्य लगाटे, दिलप्रित सिंग, शिलानंद लाक्रा आघाडी फळीत राहतील.