‘मेरे हसबंड की बीवी’मध्ये दोन नायिका
अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यापूर्वी सिंघम अगेन या चित्रपटात दिसून आला होता. आता त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘मेरे हसबंड की बीबी’ असून यात दोन नायिका असणार आहेत. निर्मात्यांनी याचे पोस्टर जारी केले आहे.
पूजा एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. याचे निर्माते वाशु भगनानी आणि जॅकी भगनानी आहेत. या चित्रपटात रकुल प्रीत सिंह आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट 21 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे.
या चित्रपटाची कहाणी प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित असेल. यात कॉमेडीचा फूल डोज पहायला मिळणार आहे. तसेच यात रोमँटिक नात्यांमधील गुंतागुंत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर असल्याने तिचा दमदार अभिनय यात पहायला मिळणार असल्याने तिचे चाहते उत्सुक आहेत.