Solapur News : करमाळ्याच्या मौलाली नगरात दोन गटात तुंबळ हाणामारी
मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान दोन गटांमध्ये वाद
करमाळा : शहरातील मौलाली नगर येथे मतदानादरम्यान प्रभागात फिरण्यावरून तसेच प्रचार करण्यावरून झालेल्या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
यामध्ये दोन गटात परस्पर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत जमीर कासम सय्यद मुजावर यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी सकाळी दहावाजण्याच्या सुमारास प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार चैताली सुनील सावंत यांचा मतदान प्रतिनिधी म्हणून जमीर काम करत होते.
यावेळी ते रोडवर थांबले असताना उस्मान हाशमोद्दीन तांबोळी यांनी जमीर यांना चापट मारली. अर्षद उस्मान तांबोळी आणि अमीर अल्ताफ तांबोळीयांनी जमीर यांना शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिली. तसेच उरमान हाशमोद्दीन तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीत जमीर सय्यद व इतर दोन अनोळखींनी उरमान तांबोळी यांना 'तू धनुष्यबाणाचा प्रचार का करतो' असे म्हणून तांबोळी यांना मारहाण करून शिवीगाळ केली आहे.