तळाशील खाडीत नौका बुडाली ; दोन मच्छिमार बेपत्ता
आचरा । प्रतिनिधी
तळाशील खाडीमध्ये दिनांक 8 जून रोजी मासेमारीसाठी गेलेली नौका जोराच्या पाऊस व वाऱ्यामुळे उलटल्याने बोटीतील दोन मच्छीमार बेपत्ता झाले असून एक मच्छीमार युवक पोहत आल्याने किनाऱ्यावर सुखरूप परतला आहे. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने या दोन बेपत्ता मच्छीमारांचा समुद्रात शोध सुरू आहे.
किशोर महादेव चोडणेकर( वय -55,) लावण्य किशोर चोडणेकर (वय - 16) वर्षे आणि धोंडीराज परब (वय 55 वर्षे) हे तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. सदर मच्छीमार आपल्या बोटीसहित सर्जेकोट तळाशील येथे मच्छीमारी करत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक जोराचा पाऊस आणि वारा आल्यामुळे त्यांची बोट नदीत उलटलेले होडीतील तिघेजण पाण्यात पडले. यातील लावण्य चोडणेकर हा युवक पोहत पोहत तळाशील किनारी आला. अन्य दोघे बेपत्ता झाल्याची माहिती त्याने स्थानिक मच्छीमारांना दिली. स्थानिक मच्छीमारांनी आपल्या नौकेद्वारे खाडीपात्रात त्यांचा शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. याबाबत मालवण पोलिसात खबर देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे. आज सकाळपासून बेपत्ता असलेल्या दोन्ही मच्छीमारांचा शोध खाडीत व समुद्रात सुरू आहे.