For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तहसीलदार कार्यालयातील दोन कर्मचारी निलंबित

11:38 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
तहसीलदार कार्यालयातील दोन कर्मचारी निलंबित
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, सातबारा उताऱ्यात फेरफार केल्याचे उघड

Advertisement

बेळगाव : सातबारा उताऱ्यांमध्ये खाडाखोड करून गैरकारभार केल्याप्रकरणी तहसीलदार कार्यालयातील भूमी विभागात कार्यरत असणाऱ्या महसूल निरीक्षक व तलाठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूल निरीक्षक उदय खातेदार व तलाठी बी. निरंजन अशी कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तहसील कार्यालयातील भूमी विभागात महसूल निरीक्षक म्हणून सेवा बजावणारे उदय खातेदार व बडाल अंकलगीचे तलाठी बी. निरंजन यांनी गैरकारभार केला असल्याचे चौकशीतून आढळून आले आहे. काकती येथील 10 एकर 12 गुंठे जमिनीसंदर्भात मूळ मालकाचे नाव बदलण्यात आले आहे. तसेच होनगा गावातील 14 एकर 12 गुंठे जमिनीसंदर्भातील मूळ मालकाचे नाव बदलून फेरफार करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांनी चुक मान्य केली आहे. प्रांताधिकारी शवण नाईक यांनी चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. या अहवालावरून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सदर कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. खातेनिहाय चौकशीसाठी आदेश जारी केला आहे.

दोषी आढल्याने कारवाई

Advertisement

सातबारा उताऱ्यांमध्ये गलथान कारभार केला असल्याचे आपल्या निदर्शनास आले होते. यावरून प्रकरणाची चौकशी हाती घेण्यात आली होती. चौकशी अंतर्गत सदर कर्मचारी दोषी आढळून आल्याने अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- प्रांताधिकारी शवण नाईक

Advertisement
Tags :

.