महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘नीट’मधील दोन डमी उमेदवारांना अटक

06:25 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीबीआयची राजस्थानमध्ये कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ भरतपूर

Advertisement

नीट-युजी पेपर लीक प्रकरणी सीबीआयने भरतपूर (राजस्थान) येथील जगन्नाथ पहाडिया मेडिकल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी डमी उमेदवार म्हणून हजारीबाग (झारखंड) येथे 5 मे रोजी पेपर दिला होता. कुमार मंगलम आणि दीपेंद्र कुमार अशी कारवाई करण्यात आलेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. दीपेंद्र हा 2023 च्या बॅचचा विद्यार्थी आहे आणि कुमार मंगलम हा 2022 बॅचचा विद्यार्थी आहे. हे दोन्ही विद्यार्थी सॉल्व्हरचे काम करायचे.

सीबीआयने 18 जुलै रोजी भरतपूरच्या जगन्नाथ पहाडिया मेडिकल कॉलेजमधून दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता अनेक बाबी उघड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या तांत्रिक देखरेख पथकाने हजारीबागमध्ये दोन्ही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची पुष्टी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. भरतपूरचे पोलीस अधीक्षक मृदुल कछावा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून सीबीआयचे पथक दिल्लीहून आले असून त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. सीबीआय अधिकाऱ्यांनी आपली खरी ओळख लपवून ही कारवाई केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article