दोन ड्रग्ज तस्करांना अमृतसरमध्ये अटक
06:20 AM Jul 29, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ अमृतसर
Advertisement
पंजाब पोलिसांनी रविवारी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर गुरजंत सिंग भोलू आणि किंदरबीर सिंग यांच्या दोन साथीदारांना अमृतसर येथून अटक केली. त्यांच्याकडून एक कोटींहून अधिक रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पंजाब डीजीपींनी सांगितले. सध्या त्यांची कसून चौकशी असून त्यांच्या इतर साथीदार आणि म्होरक्यांची माहिती वदवून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कारवाईनंतर आता लवकरच मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Advertisement
Advertisement
Next Article