For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी विमान कोसळून कॅलिफोर्नियात दोन ठार 18 जण जखमी

06:27 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
खासगी विमान कोसळून  कॅलिफोर्नियात दोन ठार 18 जण जखमी
Advertisement

वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया

Advertisement

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये गुरुवारी (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री उशिरा) एक छोटे खासगी विमान इमारतीच्या छताला धडकून कोसळले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार हे विमान इमर्जन्सी लँडिंगसाठी परतणार होते. यामध्ये 4 जण प्रवास करू शकतात. घटनेची माहिती मिळताच विमानतळ कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. विमानाच्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला इमर्जन्सी लँडिंगची माहिती दिली. मात्र, विमानात नेमकी काय समस्या होती हे स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी विमान प्राधिकरणाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 8 जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. अपघातग्रस्त विमानाने ऑरेंज काउंटीतील फुलरतन म्युनिसिपल विमानतळावरून उ•ाण केले. उ•ाण केल्यानंतर 2 मिनिटांतच ते कोसळले. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. आजूबाजूचा परिसरही रिकामा करण्यात आला. विमान धडकलेली इमारत फर्निचर उत्पादनासाठी वापरली जाते. अपघाताच्या वेळी इमारतीत सुमारे 200 लोक काम करत होते.

Advertisement

10 दिवसांतील तिसरा विमान अपघात

गेल्या 10 दिवसांतील हा तिसरा विमान अपघात आहे. यापूर्वी 25 डिसेंबर रोजी अझरबैजानहून रशियाला जाणारे विमान कझाकिस्तानमध्ये कोसळले होते. या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांनी 29 डिसेंबर रोजी दक्षिण कोरियाच्या विमानतळावर विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील 181 पैकी 179 जणांचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Tags :

.