महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंजाबमध्ये तस्करांकडून दोन कोटी रुपये जप्त

06:03 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोघे जाळ्यात : बीएसएफ-पोलिसांची संयुक्त मोहीम

Advertisement

वृत्तसंस्था/ अमृतसर

Advertisement

सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफने पंजाबमधील अमृतसर सीमेवर तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. बीएसएफच्या जवानांनी आणि पोलिसांनी तस्कराच्या घरावर छापा टाकला असून बीएसएफच्या टीमने 1 कोटी 97 लाख ऊपये म्हणजेच सुमारे दोन कोटी ऊपये जप्त केले आहेत. यावेळी पोलीस आणि बीएसएफने दोन तस्करांनाही ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी सुरू असून यात मोठे रॅकेट असल्याचा गुप्त माहिती बीएसएफच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे या तस्करांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली होती. या मोहीमेदरम्यान सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या संशयित तस्कराची माहिती मिळाली होती. आरोपी तस्कराने मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा घरात लपवून ठेवल्याचे समजल्यानंतर बीएसएफने पोलिसांशी संपर्क साधून तस्कराच्या घरावर छापा टाकला. यावेळी बीएसएफने अमृतसरच्या सीमेला लागून असलेल्या कक्कर गावात शोध सुरू करत तस्कराच्या घरापर्यंत धडक दिली.

यादरम्यान तपासावेळी घरातील दृष्य पाहून सैनिकही अवाक झाले. पोलीस आणि बीएसएफच्या पथकाने तस्कराच्या घरातून नोटांची बंडले असलेल्या तीन बॅगा जप्त केल्या. या बॅगांमध्ये एकूण 1 कोटी 97 लाख ऊपये सापडल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व रक्कम बॅगेत लपवण्यात आली होती. पोलिसांनी तिन्ही बॅगा जप्त केल्या आहेत. याशिवाय दोन तस्करांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article