कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन गुन्हेगारांचे भारतात प्रत्यार्पण

07:00 AM Jan 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : इंटरपोल रेड नोटीस अंतर्गत थायलंडमधून दोन फरार गुन्हेगारांना भारतात आणले गेले आहे. तामिळनाडू आणि गुजरातमध्ये वेगवेगळ्या प्रकरणी हे दोन्ही गुन्हेगार वाँटेड होते. सीबीआयने या प्रत्यार्पणाच्या मोहिमेचे नेतृत्व केले आहे.  या फरार गुन्हेगारांमध्ये जनार्दन सुंदरम सामील असून त्याच्यावर पॉन्जी स्कीमद्वारे गुंतवणुकदारांची 87 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुंदरमला बँकॉक येथून आणले गेले आणि तामिळनाडू पोलिसांनी कोलकाता विमानतळावर त्याला ताब्यात घेतले.

Advertisement

सीबीआयने तामिळनाडू पोलिसांच्या विनंतीनुसार 21 जून 2023 रोजी इंटरपोलला त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यास सांगितले होते. 28 जानेवारी रोजी बँकॉकचा प्रवास करणाऱ्या सुंदरमला रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावर थायलंडने प्रवेश देण्यास नकार दिला होता अशी माहिती सीबीआयने दिली आहे. तर दुसऱ्या मोहिमेत फसवणूक अन् गुन्हेगारी कटाप्रकरणी इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आलेला वाँटेड वीरेंद्रभाई पटेलला अहमदाबाद विमानतळावर अटक करण्यात आली आहे. सीबीआयने वीरेंद्रभाई विरोधात नोटीस जारी करविली होती. वीरेंद्रभाईवर 77 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article