घरफोड्या करणाऱ्या दोघा गुन्हेगारांना अटक
शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई : 4 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
यड्राव :
शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दिवसा घरफोड्या करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांना अटक केली. किरण सुभाष पाटील (वय 34, रा. राणाप्रताप चौक, गावभाग, इचलकरंजी), विनायक गजानन कुंभार (वय 26, रा. लोहार गल्ली, टाकवडे वेस, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.
त्याच्याकडून 59 ग्रॅम सोन्याचे दागिने, 85 ग्रॅम चांदीचे दागिने आणि एक मोपेड असा 4 लाख 80 हजार 200 ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या दोघा सराईत गुन्हेगारांनी शहापूर, शिरोळ, जयसिंगपूर या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवशी यांनी शुक्रवारी दुपारी दिली.
पोलीस निरीक्षक सुर्यवशी म्हणाले, शहापूर, धनगर माळ येथील डेक्कन प्रोसेसच्या मागे सुनिता विलास मोहिते ही महिला राहत आहे. या महिलेच्या घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून, चोरट्याने 27 हजार ऊपयाचे सोन्याचे दागिने चोऊन नेले होते. याबाबत शहापूर पोलिसात 27 जुलै 2024 रोजी दाखल झाला होता. या गुह्याचा शहापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तपास करीत होते.
तपासा दरम्यान तपासी पथकाला पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार किरण पाटील, गुन्हेगार विनायक कुंभार या दोघांनी केल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावऊन या दोघा गुन्हेगाराचा शोध घेवून त्याना पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी सुऊ केली. चौकशी दरम्यान या दोघा गुन्हेगारांनी सुनिता मोहिते या महिलेच्या घरात केलेल्या चोरीबरोबर शिरोळ आणि जयसिंगपूर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यावऊन दोघांना अटक कऊन, त्याच्याकडून 4 लाख 60 हजार 200 ऊपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, एक मोपेड असा 4 लाख 80 हजार 200 ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे सांगितले.
दोघेही घरफोड्या करणारे अट्टल गुन्हेगार
शहापूर पोलिसांनी घरफोडीच्या गुह्यात अटक केलेले किरण पाटील, विनायक कुंभार हे दोघेही रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत. हे दोघे दिवसा घरफोड्या करण्यामध्ये सराईत आहेत. गुन्हेगार विनायक कुंभार याच्या विरोधी जिह्यातील विविध पोलीस ठाण्यात 24 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर गुन्हेगार किरण पाटील याच्या विरोधी तीन दाखल आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुर्यवशी यानी दिली.
कारवाईत याचा सहभाग
या कारवाईत शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवशी, पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार अविनाश मुंगसे, असिफ कलायगार, रोहित डावाळे, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे आदीच्या सहभाग होता.