माणमध्ये पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल; दहिवडी, शिंगणापूरमध्ये विनयभंग, बलात्कार
दोन आरोपीस अटक; एकास चार दिवसाची पोलीस कस्टडी
दहिवडी प्रतिनिधी
माण तालुक्यातील दहिवडी व शिखरशिंगणापूर या दोन ठिकाणी अल्पवयीन मुलीवर विनयभंग, बलात्कार झाल्याची घटना घडली असून या दोन्ही ठिकाणच्या घडलेल्या घटनेतील आरोपीला दहिवडी पोलिसांनी अटक करून चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शिखरशिंगणापूर गावच्या हद्दीत शिंगणापूर ते मार्डी जाणाऱ्या रोडपासून काही अंतरावर असणाऱ्या मक्याच्या शेतामध्ये स्वत:ची अल्पवयीन मुलगी (वय : 10 वर्ष) राहणार इस्लामपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हिचा हात धरून तिला शेतात नेले व स्वत:ची व तिची जबरदस्तीने कपडे काढून तुला मक्याच्या ताटाने मारीन अशी धमकी देत तिला गप्प बसवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेबाबत पत्नीने पती मिसाळ याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तर दहिवडी गावच्या हद्दीत चव्हाण वस्ती दहिवडी या ठिकाणी राठोड हा राहण्यास आहे. खोलीमध्ये माझी आई व चुलती यांचा चार्जिंगला लावलेला मोबाईल आणण्याकरता गेले होती. यावेळी राठोड मूळ (रा. हावनूर ता. अफजलपुर जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक) सध्या रा. चव्हाणवस्ती दहिवडी विनयभंग केला म्हणून त्याच्या विरुद्ध दहिवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वरील दोन्ही गुह्याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, पो. हवा. टी.जे. काळेल करीत आहेत.