महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दलदलीत अडकून दोन म्हशी दगावल्या

12:10 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अडवई सत्तरी येथील घटना : आठ म्हशींना जीवदान देण्यात वाळपई अग्निशामक दलाला यश

Advertisement

वाळपई : भिंरोडा पंचायत क्षेत्रातील अडवई येथा एका डबक्मयाच्या दलदलीमध्ये दहा म्हशी फसण्याची घटना घडली. पैकी दोन म्हशी मृतावस्थेत आढळल्या तर आठ म्हशींना जीवदान देण्यास वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणाला यश आले. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतल्यामुळे आठ म्हशींना जीवदान मिळाले. दरम्यान या घटनेने भागामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची माहिती अशी की शांतादुर्गा मंदिराच्या मागच्या बाजूला एक दलदलस्वऊपाचे डबके तयार झाले आहे. त्या डबक्मयामध्ये चिखल असल्यामुळे म्हशी थंडाव्यासाठी जाऊन बसतात. दरम्यान सदर डबक्यात खोल असून पाणी व दलदल  असल्यामुळे उतरलेल्या म्हशी सदर ठिकाणी फसल्या. त्यांनी बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. दरम्यान या संदर्भाची माहिती स्थानिक नागरिक प्रल्हाद देसाई यांनी वाळपईच्या अग्निशामक दलाला दिल्यानंतर जवानांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. वाळपई अग्निशामक जवानांनी ताबडतोब धाव दहा पैकी घेऊन आठ म्हशीना बाहेर काढून जीवदान दिले. मात्र यामध्ये दोत म्हशी अडकून दगावल्या. अग्निशामक दलाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे डबके आडवाटेला  जंगल भागात आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सदर म्हशी गायब होत्या.  काही नागरिक सदर भागांमध्ये गेले असता त्यांना सदर म्हशी या दलदलीमध्ये फसल्याचे दिसले. त्यांनी सदर म्हशींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी अग्निशामक दलाच्या यंत्रणेशी संपर्क साधण्यात आला. अग्निशामक दलाने आठ म्हशींना जीवदान दिले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून त्यांना बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांना चारा खाऊ घालण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article