मांडरेत विषबाधा झालेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
कसबा बीड :
मांडरे (ता.करवीर ) येथील एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाल्याने तब्येत अचानक बिघडली होती. यामध्ये पांडुरंग पाटील यांचे बुधवारी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांची तब्येतही गंभीर होती. आज मंगळवारी सायंकाळी पांडुरंग पाटील यांच्या रोहित व कृष्णात या दोन मुलांचेही निधन होण्याची दु?खद घटना घडली. शिवाय तिस्रया मुलग्याची स्थिती ही चिंताजनक आहे.
पांडुरंग पाटील (वय65) , कृष्णात पांडुरंग पाटील वय (35) , प्रदीप पांडुरंग पाटील वय (32) , रोहित पांडुरंग पाटील (वय 30) यांची 15 नोव्हेंबर रोजी तब्येत बिघडली. दरम्यान सर्वांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. नंतर खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान मागील बुधवारी दवाखान्यात उपचार घेत असलेलल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती पांडुरंग पाटील यांचे निधन झाले होते. मंगळवारी कृष्णात व रोहित यांचेही निधन झाले.उपचार खर्चासठी स्वत:ची स्थावर मालमत्ता, गाय , म्हैस बैल विकून उपचार सुरू होते .आणखीन पैसेसाठी गावाने लोक वर्गणी काढून पाटील कुटुंबीयांना वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण ते निष्फळ झाले.
मांडरे येथे अन्नातून विषबाधा नसून हा घातपात आहे , अशी मागणी करत सीपीआर येथे मृत रोहित , कृष्णात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी आरोपीवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. मृत नातेवाईकांचा रोष पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करवीरचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी भेट देऊन अहवाल येताच आरोपीला ताब्यात घेऊ असे सांगितले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आले.