For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन दुचाकी अज्ञातांनी विनायकनगर येथे पेटविल्या

12:00 PM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन दुचाकी अज्ञातांनी विनायकनगर येथे पेटविल्या
Advertisement

बेळगाव : विनायकनगर येथे घरासमोर पार्किंग करण्यात आलेल्या दोन दुचाकी खुल्या जागेमध्ये नेऊन पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आग लावणाऱ्या अज्ञातांच्या विरोधात कॅम्प पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅन्थोनी आर. रॉड्रीग्ज यांनी अपार्टमेंटमध्ये आपली यामाहा मोटारसायकल आणि एम्पायर अलाईड इलेक्ट्रिक वाहन पार्किंग केली होती. रात्री अडीजच्या सुमाराला त्या दोन दुचाकी खुल्या जागेमध्ये नेऊन आग लावण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कॅम्प पोलीस स्थानकामध्ये अॅन्थोनी यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.