महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विषारी कचऱ्याच्या निषेधार्थ दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

06:45 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदारांचे उपोषणास्त्र : पिथमपूरमध्ये संघर्षमय स्थिती

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

Advertisement

भोपाळ वायू दुर्घटनेशी संबंधित युनियन कार्बाइड कारखान्यांच्या कचऱ्याबाबत पिथमपूरमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. पिथमपूरमध्ये हा कचरा टाकला जाणार असल्याने स्थानिक लोक विरोध करत आहेत. याप्रकरणी पिथमपूरमधील दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. दोघांनाही गंभीर अवस्थेत चोइथराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिथमपूरच्या प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात लोकांची गर्दी झाली आहे. सैलानाचे आमदार कमलेश्वर दोडियार यांनी पिथमपूर येथे उपोषण सुरू केले आहे. येथे 337 मेट्रिक टन विषारी कचरा जाळल्याने लोकांना कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकेल अशी भीती व्यक्त करतानाच सरकारची वृत्ती चांगली नाही, असा हल्लाबोल दोडियार यांनी चढवला.

भोपाळहून पिथमपूरपर्यंत कचरा आल्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी श्वास रोखून धरला आहे. पोलीस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सल्ल्याचा जनतेवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. सर्व संघटना व संस्था एका व्यासपीठावर एकत्र येऊन विरोध करत आहेत. पिथमपूरमधील लोकांचा विरोध पाहता पोलिसांनी सर्व बाजूंनी रस्ते बंद केल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले दिसून येत आहे. बंदला शहरवासियांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. बंदचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. कचरा जाळल्यास आंदोलन आणखी चिघळणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या आंदोलनाला इंदोरवासियांचाही पाठिंबा मिळालेला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article