For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोट्यावधीच्या फसवणूक प्रकरणी महिलेसह दोघांना अटक

04:18 PM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोट्यावधीच्या फसवणूक प्रकरणी महिलेसह दोघांना अटक
Advertisement

सीआयडी पोलिसांची गालजीबाग काणकोण येथे कारवाई  : पर्वरीत पाच जणांना खोट्या आमिषाद्वारे 5.79 कोटींचा गंडा

Advertisement

पणजी : गेल्यावर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये पर्वरीतील पाच जणांना सोन्याच्या व्यापारात दुप्पट नफा मिळवून देण्याची खोटी आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह दोघा संशयितांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शनिवारी मुसक्या आवळल्या. संशयितांनी पर्वरी परिसरातील पाच जणांना 5 कोटी 79 लाख 77 हजार ऊपयांना गंडा घातला होता. दोन्ही संशयितांना न्यायालयात रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काणकोण गालजीबाग येथे अटक केलेल्या संशयितांमध्ये अक्षय अनंत सावंत (34, 2/102, श्री पिंपळेश्वर सहकारी, गृहनिर्माण, संस्था, महादेव पालव मार्ग, करी रोड स्टेशन, करीरोड पश्चिम, मुंबई), पल्लवी आत्माराम घाडगे (33, रावली कॅम्प, प्रतीक्षा नगर, सायन (पूर्व) मुंबई) यांचा समावेश आहे. संशयित फसवणूक प्रकरणातील सराईत असून एका ठिकाणी लोकांना गंडा घालून कोट्यावधीची माया जमवून मुंबईत पलायन करतात. त्यानंतर वर्ष दोन वर्षे प्रकरण शांत होईपर्यंत अलिप्त राहतात.

Advertisement

यापूर्वी संशयितांनी मुंबई, सातारा आणि उत्तर गोव्यात अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार केले आहेत. उत्तर गोव्यात पर्वरी परिसरातील पाच जणांना 5 कोटी 79 लाख 77 हजार ऊपयांचा गंडा घालून पोबारा केला होता. याबाबत मोहम्मद शरीफ वसीम खान यांनी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ती तक्रार गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आली होती.

संशयितांचा मनसुबा उधळला 

सुमारे सतरा महिन्यांनी संशयित पुन्हा गोव्यात आले होते. यावेळी त्यांनी आपला मोर्चा दक्षिण गोव्यात वळविला होता. दक्षिण गोव्यात काही लोकांना त्यांनी आपल्या जाळ्dयात अडकविले होते. त्यांना कोट्यावधी ऊपयांना गंडा घालण्याचा त्यांचा मनसुबा होता. एका व्यक्तीला त्यांनी आपल्या जाळ्dयात पुरेपुर फसवून त्याच्याकडून काही रक्कम घेतली होती. त्याला सुमारे 10 हजार ऊपयांचे सोने परत दिले होते. मात्र उर्वरित 42 हजार ऊपयांचे सोने परत देण्यास संशयितांना  उशीर झाला होता. त्यामुळे त्याने पोलिसांचा संपर्क साधून याबाबत माहिती दिली. सीआयडी पोलिसांनी सापळा रचून शिताफिने संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

सोने व्यापारी असल्याचा बनाव!

संशयित स्वत:ची ओळख सोने खरेदी विक्री व्यवसायिक असल्याचे सांगून आपले एजंट होण्याची ऑफर देतात. या व्यवसायात मोठा फायदा असून सोने किंवा पैशांच्या स्वरूपात मोबदला मिळतो, अशा भूलथापा मारून आमिषे दाखवतात. एकदा बकरा आपल्या कचाट्यात अडकला की त्याला ‘श्री व्यंकटेश्वर बुलियन गोल्ड’ या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगतात. त्यानंतर एजंटांना सोन्याच्या बदल्यात गुंतवणूकदारांकडून पैसे मिळविण्यास प्रवृत्त करतात. सुऊवातीला एजंटना काही प्रमाणात रक्कम किंवा सोने दिले जाते, मात्र मोठी रक्कम जमा झाली की गुतवणूक केलेली सर्व रक्कम गुंडाळून पोबारा करतात, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

संबंधित संशयित गोव्यात आल्याची माहिती प्राप्त होताक्षणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा रचला. दोन्ही संशयितांना शिताफिने अटक केली आहे. ही कारवाई सीआयडीचे उपअधीक्षक सूरज हळर्णकर, निरीक्षक विकास देयेकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सतीश नाईक, कॉन्स्टेबल सुशांत पागी, संदेश कांबळी, सामीउल्ला मकानदार, ऊपेश गायकवाड आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल किरण गावस यांनी ही कारवाई केली आहे. सीआयडीचे अधीक्षक राहूल गुप्ता उपअधीक्षक सुरज हळर्णकर आणि राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास निरीक्षक विकास एम. देयकर आणि त्यांचे पथक करीत आहेत.

Advertisement
Tags :

.