महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘एनआयए’च्या छाप्यात तामिळनाडूत दोघांना अटक

06:22 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिज्ब-उत-तहरीर’प्रकरणी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी तामिळनाडूतील पाच जिह्यांमध्ये 10 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईवेळी एनआयएने दोघांना अटक केली आहे. ‘हिज्ब-उत-तहरीर’ प्रकरणात एनआयएने ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी ‘हिज्ब-उत-तहरीर’चे सदस्य आहेत. ही आंतरराष्ट्रीय इस्लामी आणि कट्टरतावादी संघटना आहे. इस्लामिक खिलाफत पुन्हा प्रस्थापित करणे हा त्यांचा उद्देश आहे. तसेच, त्यांना ‘हिज्ब-उत-तहरीर’चे संस्थापक तकी अल-दिन अल-नभानी यांनी लिहिलेल्या संविधानाची अंमलबजावणी करण्यातही सक्रीय आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमान आणि मुजीबुर रहमान उर्फ मुजीबुर रहमान अल्थम साहिब अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही तंजावर जिह्यातील रहिवासी आहेत. तऊणांना कट्टरपंथी विचारसरणीत प्रवृत्त करणे, लोकशाही आणि भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्यायव्यवस्था इत्यादींना इस्लामविरोधी म्हणून प्रवृत्त करण्यासाठी गुप्त केंद्र चालवण्यात त्यांचा सहभाग असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे.

छाप्यादरम्यान, एनआयएने डिजिटल उपकरणे (मोबाईल फोन, लॅपटॉप, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड) आणि अनेक संशयास्पद दस्तऐवज जप्त केले आहेत. तामिळनाडूच्या मदुराई शहरातील थिदिर नगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social-media
Next Article