बेकायदा रक्कम वाहतूक प्रकरणी दोघे ताब्यात
कारवार तालुक्यातील माजाळी तपासणी नाक्यावरील घटना
कारवार : दारूच्या बाटल्या शोधायच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांना एक कोटी रुपये सापडल्याची घटना सोमवारी रात्री कर्नाटक-गोवा सीमेवरील कारवार तालुक्यातील माजाळी तपासणी नाक्यावर घडली आहे. बेहिशेबी आणि बेकायदेशीर पद्धतीने बसमधून होत असलेल्या एक कोटी रुपयांच्या वाहतूक प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्यांची नावे कल्पेश कुमार (रा. बेंगळूर) आणि बमूर राम (रा. राजस्थान) अशी आहेत. ही कारवाई चिताकुला (सदाशिवगड) पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी समजलेली अधिक माहिती अशी, कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर कारवार तालुक्यातील माजाळी येथे कर्नाटक सरकारचे अबकारी आणि पोलीस खात्याचे तपासणी नाके आहेत.
तथापि, पोलिसांनी त्याच्यावर विश्वास दाखविला नाही. कारण कोणत्याही कागदपत्राशिवाय तो एवढ्या मोठ्या रकमेची बेकायदेशीर वाहतूक करीत होता. एक कोटी रुपयांचा मालक कोण? ही रक्कम कुणाकडे सोपविण्यासाठी नेली जात होती? गोव्यातून की अन्य ठिकाणाहून ही रक्कम आणण्यात आली याचा शोध पोलीस घेत आहेत. ही रक्कम राजकीय फंडिंगसाठी तर वापरली जाणार नव्हती ना? याचाही पोलीस तपास करत आहे. तपासाअंती सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. दरम्यान, माजाळी तपासणी नाक्यावरील तपास यंत्रणा अधिक कडक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.