दिवोदिता खूनप्रकरणी दोघांना अटक
मालमत्तेच्या देवाणघेवाणीतून खून झाल्याचे उघड
म्हापसा : नाईकवाडा कळंगुट येथील मार्केटमध्ये असलेल्या एका प्लॅटमध्ये दिवोदिता फर्नांडिस (64) या वृद्धेचा मृतदेह संशयास्पद आढळला होता. शवचिकित्सा अहवालात तिचा गळा आवळून खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांना दोघाना पकडण्यात यश आले आहे. हे दोघेही मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवसायात आहेत. ते ब्रोकर म्हणून काम करीत आहेत. कमिशनवरून वाद झाल्याने दिवोदिताचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दोघेही आरोपी महाराशट्रातील आहेत. आकिस उर्फ शौकत खलपे (रत्नागिरी) व निखिल चंद्रकांत राणे (पुणे) अशी आरोपीची नावे आहेत. हे संशयित महाराट्रात पळून गेल्याचे समजल्यावर पोलीस पथके त्या ठिकाणी पाठविण्यात आली होती. मालमत्तेची देवाणघेवाण व पैशाच्या वादातून हा खून पूर्वनियोजितपणे केल्याचे उघड झाले आहे. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्यामार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी घटनेचा पंचनामा केला होता. संशयिताना 10 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.