चंदनाच्या झाडाची चोरी, दोघांना अटक
कोल्हापूर :
शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरातील कृष्णा इमारतीच्या मागील बाजूस असलेली चंदनाची झाडे गेल्या आठवड्यात चोरट्यांनी कापून नेल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन तरुणासह करण उर्फ समुसलाल सरायलाल पवार उर्फ पारधी (वय 55) आणि रुलबाबू सरायलाल पवार उर्फ पारधी (वय 20, दोघे मुळ रा. हरदुवा, जि. कटणी, राज्य मध्यप्रदेश, सध्या रा. रायबाग, राज्य कर्नाटक) या दोघांना अटक केली. या तिघा संशयितांनी चोऊन नेलेली चंदनाची झाडे कोणास विकली आहेत. याचीही माहिती त्यानी दिली. त्यावऊन पोलिसांनी त्या संबंधीत व्यक्तीचा शोध सुऊ केला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुरुवारी दिली.
न्यायालयाच्या परिसरातील कृष्णा इमारतीच्या मागील बाजूस असलेली चंदनाच्या झाडाची 20 ते 21 जानेवारी चोरट्यांनी चोरी केली होती. याबाबत शाहुपूरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याचा तपास शाहुपूरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुऊ केला होता. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाला ही झाडे तपास सुरू केला. रायबाग (कर्नाटक) येथील पारधी समाजातील एका अल्पवयीनसह तिघांनी केल्याची माहिती बातमीदारांकडून समजली. त्यावऊन रायबाग येथे छापा टाकून संशयित करण उर्फ समुसलाल पवार उर्फ पारधी (वय 55) आणि रुलबाबू पवार उर्फ पारधी या दोघासह एका अल्पवयीन तऊणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे या चोरीविषयी कसून चौकशी सुऊ केली. चौकशीमध्ये या तिघा संशयितांनी न्यायालयाच्या परिसरातील चंदनाची झाडे चोऊन नेल्याची गुह्याची कबुली दिल्याने, त्यांना अटक केली. या तिघांना पुढील तपासाठी शाहूपूरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक कळमकर यांनी दिली.