कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ट्रॅव्हल्सवर दगड कोसळून दोन अमेरिकनांचा मृत्यू

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था /रुद्रप्रयाग

Advertisement

उत्तराखंडमधील ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर नारकोटजवळ मोठा अपघात झाला आहे. ऊद्रप्रयागच्या 5 किमी आधी डोंगरावरून एक भला मोठा दगड वाहनावर कोसळल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्य 7 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टेम्पो ट्रॅव्हलमधून प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली आहे. सर्व प्रवासी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य केले. मृत झालेल्या दोघांचीही ओळख पटली असून मृतांविषयीची माहिती अमेरिकन दुतावासाला पुरविण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article