महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चोवीस तास, एकशेपन्नास रेस्टॉरंटस्

06:50 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आलिकडच्या काळात ‘फास्टफूड’ हे जणू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तीन-चार दशकांपूर्वी ज्याची ‘बाजारु अन्न’ अशी हेटाळणी केली जात असे, असे हे फास्टफूड सध्याच्या काळात आपल्या खाद्यसंस्कृतीत महत्वाचे स्थान मिळवून बसले आहे. तरीही आपण दिवसातून जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा अशा अन्नाचा आस्वाद घेऊ शकतो. पण नायजेरिया या देशातील मुनाचिम्सो ब्रियान न्वाना नामक खवय्याने 24 तासांमध्ये तब्बल 150 रेस्टॉरंटस्मध्ये जाऊन फास्टफूड खाण्याचा एक आश्चर्यकारक विक्रम केला आहे.

Advertisement

न्वाना हा 22 वर्षांचा युवक आहे. त्याने हा विक्रम पैज लावून केला आहे. विशेष म्हणजे, एका रेस्टॉरंटमधून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाताना त्याने वाहनाचा उपयोग केलेला नाही, तर स्वत:च्या पायाने पळत जाऊन त्याने 24 तासांमध्ये 150 रेस्टॉरंटस्ना भेट दिली. यासाठी त्याला अक्षरश: पळावे लागले. अशा प्रकारचा यापूर्वीचा विक्रम अमेरिकेचा नागरिक एरिक याने केला होता. त्याने 24 तासांमध्ये 100 रेस्टॉरंटस् पालथी घातली होती. त्याहीपूर्वी निक डिजिओवानी आणि दिवंगत लिन डेव्हीस यांनी अशा प्रकारचा विक्रम केला होता. पण न्वाना या युवकाने हे सर्व विक्रम आता मोडीत काढले असून नवे किर्तीमान प्रस्थापित केले आहे.

Advertisement

त्याने हा विक्रम नायजेरियाची राजधानी अजूबा या शहरात केला. हे शहर जगातील इतर मोठ्या शहरांच्या मानाने कमी विकसीत आहे. येथे रेस्टॉरंटस्ची संख्या फारशी नाही. जी रेस्टॉरंटस् आहेत, ती एकमेकांपासून दूर आहेत. शिवाय येथे सार्वजनिक वाहतूक सेवाही फारशी नाही. शिवाय या विक्रम प्रयत्नाची अट अशी होती की खासगी वाहनाचा उपयोग करता येणार नव्हता. त्यामुळे त्याने पायी पळत जाऊनच ही स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला अन् तो सफलही केला. यापूर्वी जे असे विक्रम झाले आहेत, ते न्यूयॉर्क अथवा तत्सम जागतिक किर्तीच्या महानगरांमध्ये झाले आहेत, जेथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेगवान आहे, तसेच अनेक रेस्टॉरंटस् असून त्यांच्यातील अंतर कमी आहे. न्वाना याचा विक्रम आता ‘गिनीज विक्रम पुस्तिकेत’ समाविष्ट करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article