बारा गाळे सील, एक नळ कनेक्शन कट
सातारा :
शहरात जे जे थकबाकीदार आहेत त्यांच्यावर कारवाईचा धडाका पालिकेच्या वसुली विभागाने सुरु केलेला आहे. त्यामध्ये मल्हारपेठेत 12 गाळ्यावर तर शुक्रवार पेठेत एकाचे नळ कनेक्शन तोडले असून ही कारवाई सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सुचनेनुसार वसुली विभागाच्या पथकाने केली आहे.
मल्हारपेठ क्रमांक 97 अ, ब, क येथील मिळकत धारक रुद्रप्पा तावस्कर, पद्माकर तावस्कर, दिलीप तावस्कर, किरण तावस्कर, कालिदास तावस्कर यांच्या गोकुळ मंगल कार्यालयाचे 9 दुकान गाळे व कार्यालयालगतचे इतर दोन हॉल अशी एकूण बारा गाळ्यावर वसुली विभागाने कारवाई केली. या मिळकतीची एकूण थकबाकी 5 लाख 6 हजार 718 रुपये होती. थकबाकी न भरल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शननुसार ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत कर अधिकारी उमेश महादार, वॉरंट अधिकारी अमित निकम, भाग लिपिक संजय कोळी, राजेश भोसले, राजेंद्र शेळके, भारत चौधरी, तुकाराम गायकवाड, युवराज खरात, अशोक चव्हाण, युवराज खरात, नितीन रणदिवे, अशोक चव्हाण, अनिल बडेकर आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच शुक्रवार पेठ येथील प्रभाकर नरहरी कुलकर्णी यांच्या मिळकतीची थकबाकी 10 लाख 76 हजार 26 रुपये असल्याने त्यांच्यावरही नळ कनेक्शन कट करण्याची कार्यवाही करण्यात आली.