टीव्हीएस मोटर्सची नॉर्टन मोटरसायकल्समध्ये गुंतवणूक
चेन्नई :
टीव्हीएस मोटर कंपनीने इंग्लंडमधील मोटरसायकल निर्माती कंपनी नॉर्टन मोटरसायकल्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी जवळपास 200 पौंडची गुंतवणूक करणार असून यायोगे आंतरराष्ट्रीय बाजारात टीव्हीएस उतरण्याची योजना करत आहे.
दुचाकी आणि तिचाकी वाहन क्षेत्रात टीव्हीएस ही आघाडीवरची भारतातील कंपनी आहे. ब्रिटनमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ब्रँडसमवेत कंपनी आगामी काळात 6 नव्या बाईक्स बाजारात उतरवणार आहे, अशी माहिती आहे. टीव्हीएस मोटर्सने आपल्या सिंगापूरमधील भागीदारामार्फत नॉर्टनचे अधिग्रहण केले आहे. सदरची नवी गुंतवणूक ही उत्पादन विकास, सुविधा, संशोधन आणि जागतिक दर्जाची अभियांत्रिकी प्रणाली वापरण्याकरीता केली जाणार आहे. नॉर्टन येणाऱ्या काळात अमेरिकेसोबत जर्मनी, फ्रान्स, इटली आणि भारतात आपल्या उत्पादनांना सादरीकरणाच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.