For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजाज पल्सर एन 125 भारतात लाँच

07:00 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
बजाज पल्सर एन 125 भारतात लाँच
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

बजाज ऑटोने पल्सर एन 125 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. बजाजने हे मॉडेल जेन-झेड रायडर्सना लक्षात घेऊन बनवले आहे. बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह संपूर्ण डिजिटल एलसीडी क्रीन आहे. कंपनीचा दावा आहे की ही 125सीसी सेगमेंटमधील सर्वात वेगवान 0 ते 60 केएमपीएच वेग असलेली सर्वात शक्तिशाली दुचाकी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही मोटरसायकल एलईडी डिस्क आणि एलईडी डिस्क बीटी या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. बाइकच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 94,707 रुपये एक्स-शोरूम आहे, तर टॉप-स्पेस एलइडी डिस्क बीटी ट्रिम रुपये 98,707 (दोन्ही एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे.

डिझाइन: 7 रंग पर्याय उपलब्ध असतील. बजाज पल्सर एन125 मध्ये एलईडी हेडलाइट्सभोवती झेड-आकाराचे एलईडी डीआरएल आहेत. त्याचे टेल लाइट्स देखील एलइडी युनिट्स आहेत आणि इंडिकेटर बल्ब प्रकारचे आहेत. याचे टँक एक्स्टेंशन खूपच आक्रमक आहे, ज्यामुळे बाइकला स्पोर्टी लुक मिळतो आणि मागील बाजूस सिंगल पीस ग्रॅब रेल देण्यात आली आहे. त्याच्या काट्यावर प्लास्टिकचे आवरण असते जे धुळीपासून संरक्षण देते. बाईकमध्ये स्प्लिट-सीट सेटअप आणि अंडरबेली एक्झॉस्ट देखील आहे. यात 7 रंगांचे पर्याय मिळतील.

Advertisement

मोटरसायकल 125सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनने युक्त आहे, जे 11.8 एचपीची कमाल पॉवर आणि 11एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहे. बजाज पल्सर एन125 : हार्डवेअर आणि वैशिष्ट्यो आरामदायी राइडिंगसाठी बाइकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक सस्पेंशन आहे. त्याच वेळी, सुरक्षेसाठी ण्ँए सपोर्टसह ब्रेकिंगसाठी फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम सेटअप देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.