कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुयेत साकारणार ‘अँटी ड्रोन’

12:33 PM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

झेन टेक्नॉलॉजीस कंपनीसमवेत सरकारचा सामंजस्य करार : कारखाना उभारणीसाठी कंपनी करणार 50 कोटींची प्राथमिक गुंतवणूक

Advertisement

पणजी : राज्याला तांत्रिक क्षेत्रात सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील भाजप सरकारने गतिमान पावले उचलण्यास सुरूवात केली आहेत. तुये-पेडणे येथे झेन टेक्नॉलॉजीसचा अँटी ड्रोन कारखाना साकारणार असून, या कारखाना उभारणीसाठी तब्बल 50 कोटी ऊपयांची प्राथमिक गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यात शेकडो नोकऱ्या निर्माण होण्यासाठी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. यावेळी आयटी खात्याचे मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, तुये येथे कारखाना उभारण्यासाठी गोवा सरकारने झेन टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्यासमवेत काल सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता तुये-पेडणे येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) अँटी-ड्रोन सिस्टम मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन होणार आहे. सामंजस्य कराराप्रमाणे  कंपनी 50 कोटी ऊपयांची प्रारंभिक गुंतवणूक आणणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement

तुये-पेडणे येथे प्रकल्प तसेच प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी झेन टेक्नॉलॉजीस कंपनीला जमीन देण्यात आली आहे. कारखाना उभा राहिल्यानंतर अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यामुळे सुमारे 800 नोकऱ्या निर्माण होतील, असा दावाही मुख्यमंत्री सावंत यांनी केला. यामध्ये मुख्यत्वे अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाईल याची खात्री करण्यासाठी कंपनी तयार होईल तोपर्यंत गोव्यातील तऊणही तेथे नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन तयार असतील, अशी माहिती सावंत यांनी दिली. दरम्यान, अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याने पेडणे तालुक्याला अच्छे दिन येणार आहेत. झेन टेक्नॉलॉजीस लिमिटेडचा कारखाना उभा राहिल्यास राज्यात शेकडो नोकऱ्या निर्माण होणार आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनाही तांत्रिक प्रशिक्षणाचा अनुभव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

निर्यातदार कंपनी स्थापू शकणार उत्पादन युनिट

जी कंपनी निर्यातीत पुढे आहे, अशी कंपनीच तुये-पेडणे येथे आपले उत्पादन युनिट स्थापन करण्याची अपेक्षा आहे. 2 वर्षांच्या कालावधीत हे युनिट होण्याची अपेक्षा आहे. झेन टेक्नॉलॉजीस लिमिटेड ही कंपनी प्रामुख्याने शस्त्रs आणि संबंधित संरक्षण उपकरणे आणि संरक्षण प्रशिक्षण प्रणालींसाठी सिम्युलेटर प्रदान करते.

उद्योग उभारणीची प्रक्रिया सुरू

इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरकडे (ईएमसी) तुये येथील 45 प्लॉट्स मायक्रो कॅटेगरी अंतर्गत आणि 15 प्लॉट्स मोठे उद्योग उभारण्यासाठी आहेत. उद्योगांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या 200 कोटी ऊपयांची एकूण गुंतवणूक क्षमता आणि 2000 रोजगार क्षमता असलेले 4 सूक्ष्म स्तरावरील उद्योग आणि 2 मोठे उद्योग उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पायाभूत सुविधा वेगाने तयार होत आहेत, असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article