For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कपकपी’मध्ये तुषार अन् श्रेयस

06:27 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘कपकपी’मध्ये तुषार अन् श्रेयस
Advertisement

हॉरर-कॉमेडी धाटणीचा चित्रपट

Advertisement

गोलमाल रिटर्न्स आणि गोलमाल 3 या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसायला  लावणारा अभिनेता श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांची जोडी पुन्हा एकत्र दिसून येणार आहे.  त्यांचा नवा चित्रपट ‘कपकपी’ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टरही सादर करण्यात आले आहे.

‘क्या कूल हैं हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले संगीथ सिवन हे याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर सौरभ आनंद आणि कुमार प्रियदर्शी यांनी याची कथा लिहिली आहे. जयेश पटेल यांच्या ब्रावो एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली याची निर्मिती केली जात आहे. श्रेयसने चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Advertisement

कपकपी हॉरर आणि कॉमेडीचे असे मिश्रण आहे, जे तुम्ही पूर्वी कधीच पाहिले नसेल असे श्रेयसने म्हटले आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या चित्रपटात श्रेयस आणि तुषारसोबत सोनिया राठी, सिद्धी इदनानी, जय ठक्कर, वरुण पांडे, धीरेंद्र तिवारी, दिनकर शर्मा आणि अभिषेक कुमार यांची मुख्य भूमिका असेल.

श्रेयस याचबरोबर लवकरच ‘लव यू शंकर’ या चित्रपटात दिसून येईल. हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर त्याचा ‘गोलमाल 5’ आणि ‘इमरजेंसी’ चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

Advertisement
Tags :

.