Turmeric Crop : उत्पादन घटल्याने हंगामात दर चढणार, हळदीला आणि बियाणालाही दुप्पट दर!
यंदाच्या हंगामात हळदीला सरासरी १२ ते १४ हजार दर मिळत आहे
By : सुभाष वाघमोडे
सांगली : हळदीसाठी प्रसिध्द असलेल्या सांगली मार्केट यार्डात नवीन हळदीचा हंगाम सुरू झाली आहे. मागील वर्षी झालेल्या अतिपावसाने हळद उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून दहा ते पंधरा टक्के उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे. यामुळे यंदाच्या हंगामात हळदीला सरासरी १२ ते १४ हजार दर मिळत आहे.
सध्या भाव चढेच आहेत, यार्डात रोज तीन ते चार हजारावर क्विंटल हळदीची आवक होत आहे. दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान हळदीला चांगला भाव मिळत असल्याने हळद बियाणांच्या दरातही वाढ झाली असून सध्या यार्डात विक्रीस आलेल्या हळद बियाणांला सहा ते सात हजार क्विंटलला दर मिळत आहे.
हळदीच्या उलाढालीसाठी आणि प्रक्रिया उद्योगासाठी सांगली प्रसिध्द आहे. वाळवा, पलूस, मिरज, कवठेमहंकाळ भागात हळद पीक घेतात. कर्नाटकासह निजामबाद, नांदेडसह मराठवाड्यातील हळद विश्वासार्हतेमुळे येथील वसंतदादा मार्केट यार्डात सौद्याला येते. स्थानिकसह राजापुरी, सेलम, कडाप्पा यासह इतर जातीच्या हळदीची आवक होते.
कच्च्या हळदीपासून उच्चप्रतिची हजारो क्विंटल हळद पावडर येथे निर्माण होते. पण २०१२ पासून या व्यवसायासमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षभरापासून हळदीच्या दरात चांगली वाढ झाली आहे. गेली वर्षभर सरासरी दहा ते बारा हजार इतका दर राहिला.
गेल्या दीड दोन महिन्यापासून नवीन हळदीच्या हंगामाला सुरूवात झाली असुन चांगल्या हळदीचा दर ३० हजारावर गेला आहे. तर सरासरी दर बारा ते चौदा हजार सुरू आहे. आवक कमी असल्याने यंदाच्या हंगामात दर चढेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दर चांगला मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नैसर्गिक आपत्तीचा दरावर परिणाम
कधी जादा उत्पादनामुळे दर घसरले. त्यातच कोरोनापासून चार वर्षे तशीच गेली. गेली बारा ते चौदा वर्षे हळदीला दर मिळेनासा झाला. सरासरी आठ ते दहा हजाराच्या आतच तो राहिला. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. पण, उसाच्या बरोबरीने पैसे देणारे हे पीक असल्याने उत्पादन घटले तरी ते पूर्ण थांबले नाही.
नफा मात्र कमी झाला. कोरोनाकाळात नंतरही सात ते आठ हजारच दर राहिला. लागण पूर्णत: घटली होती. मात्र गेल्या २०१२ नंतर कधी नैसर्गिक आपत्ती तर वर्षापासून पुन्हा दराची झळाळी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला आहे.
सरासरी एक कोटी आवक, ४० टक्के घट
सांगली मार्केट यार्डात वर्षाला किमान एक कोटी पोती हळदीची आवक होते. स्थानिक उत्पादन कमालीचे घटले तरी मराठवाडा आणि कर्नाटकातून आवक होतेच. मात्र तेथेही उत्पादन घटणार असल्याने ३० ते ४० लाख पोती कमी आवक होईल अशी शक्यता व्यापाऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
फेब्रुवारीपासून सुरू झाला नवीन हंगाम
यंदाच्या हंगामातील हळदीच्या सौद्याचा शुभारंभ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मार्केट यार्डात करण्यात आला. तेव्हा क्विंटलला विक्रमी ३१ हजार दर मिळाला. सरासरी १५ हजाराच्या वर दर मिळाला. सांगली बाजारातून एक सकारात्मक संदेश द्यावा असा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला आहे.
साखळी करून शेतकऱ्यांची फसवणूक नको
आवक वाढल्यावर मात्र साखळी करून दर पाडण्याचा प्रयत्न होऊ नये अशी परिसरातील शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. एक दोन कलमाचा उच्च दर ठरवायचा आणि आवक होऊ लागल्यानंतर साखळी करायचे असे प्रयत्न होऊ नये आणि सांगलीचे नाव बदनाम होऊ नये याची जबाबदारी बाजार समितीला पार पाडावी लागणार आहे. आता कुठे या हंगामात चार पैसे मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी हीत पहावे अशी मागणी आहे.
बियाणाचा दरही दुप्पट
मे महिन्यामध्ये शेतकरी हळदीची लागण करतात. या लागणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे विक्रीसाठी आणले आहेत. मार्केट यार्डात गेल्या पंधरा-वीस दिवसापासून हळद बियाणे विकीसाठी आणले आहे. या बियाणांचा दरही यंदा दुप्पट झाला आहे. गेल्या वर्षी हे दर तीन ते साडेतीन हजार रूपये टन होते. यंदा हे दर साडेसहा ते सात हजार इतके झाले आहेत. बियाणांच्या दरात वाढ झाल्याने लागणीचा खर्चही वाढणार आहे.
पहिल्या सौद्यातील दर
नवीन हंगामातील पहिल्या सौवयात हळवीला विक्रमी असा भाव मिळाला. सौद्यात राजापूरी लगडी हळवीला विक्रमी क्विंटलला २५ हजार इतका भाव मिळाला. हाच मागील सौद्यात २१ हजार इतका भाव होता. चोरा हळवीलाही क्विंटलला २८ हजार इतका वर मिळाला.
सौद्यात राजापूरी कणीला १२ हजार ७०० ते १३ हजार ७००, राजापूरी पावडर क्वालिटीला ११४२०० ते १६०००, ते राजापूरी गट्टा १२५०० ते १६०००, वेशी कडाप्पा १३५०० ते १४८०० इतका वर मिळाला आहे. सध्या हळवीचा हा वर टिकून आहे. आवक आणि उत्पादन घटल्याने यंवा हळवीला चांगला वर राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.