महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तुर्कियेच्या अध्यक्षांची इस्रायलला धमकी

06:47 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायलकडून चोख प्रत्युत्तर : सद्दाम हुसैनसारखी गत होईल

Advertisement

वृत्तसंस्था/ अंकारा, तेल अवीव

Advertisement

मध्यपूर्वेत तणावादरम्यान आता तुर्कियेने इस्रायलला धमकी दिली आहे. तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांनी इस्रायलच्या विरोधात सैन्य कारवाईची धमकी दिली आहे. तर इस्रायलने एर्दोगान यांची गत इराकचे माजी हुकुमशहा सद्दाम हुसैन यांच्यासारखी होईल असे प्रत्युत्तर दिले आहे.

इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी देत एर्दोगान हे सद्दाम हुसैन यांचे अनुकरण करू पाहत आहेत. परंतु सद्दाम हुसैन यांचा अंत कसा झाला हे एर्दोगान यांनी आठवू पहावे असे इस्रायलचे विदेशमंत्री काट्ज यांनी म्हटले आहे. तुर्कियेचे सैन्य इस्रायलमध्ये घुसू शकते, यापूर्वी लीबिया आणि नागोर्नो-काराबाखमध्ये आमचे सैन्य शिरले होते असा दावा एर्दोगान यांनी केला होता.

एर्दोगान हे इस्रायलच्या गाझामधील सैन्यमोहिमेचे कट्टर विरोधक राहिले आहेत. इस्रायलला पॅलेस्टाइनवर अन्याय करता येऊ नये म्हणून आम्हाला मजबूत व्हावे लागणार आहे. आम्ही ज्याप्रकारे काराबाखमध्ये घुसलो, ज्याप्रकारे लीबियात घुसून आम्ही कारवाई करू शकलो, त्याचप्रकारे इस्रायलमध्ये कारवाई करू शकतो असे एर्दोगान यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.

तुर्कियेच्या सैन्याने लीबियात 2020 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाकडून मान्यताप्राप्त गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल अकॉर्ड ऑफ लीबियाचे समर्थन केले होते. लीबियाचे पंतप्रधान अब्दुलहामिद अल-दबीबा यांना तुर्कियेचे पाठबळ प्राप्त आहे. तर अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील नागोर्नो-काराबाख संघर्षातही तुर्कियेने भूमिका बजावली होती. तुर्कियेने अझरबैजानला सैन्य प्रशिक्षण आणि आधुनिकीकरण सहाय्य प्रदान केले होते. परंतु प्रत्यक्ष स्वरुपात सैन्यमोहिमांमध्ये भाग घेण्यास तुर्कियेने नकार दिला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#international#social media
Next Article