नाटोमधील स्वीडनच्या प्रवेशाला तुर्कियेकडून हिरवा कंदील
सैन्यआघाडीतल सामील होण्याचा मार्ग प्रशस्त
वृत्तसंस्था/ अंकारा
तुर्कियेच्या नेत्यांनी स्वीडनला नाटोचे सदस्यत्व प्रदान करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दर्शविले आहे. तुर्कियेकडून समर्थन मिळाल्याने आता केवळ हंगेरीकडून मंजुरी मिळण्याची आवश्यकता आहे. नाटो सदस्य असलेल्या तुर्कियेने मागील एक वर्षापासून स्वीडनच्या सदस्यत्वाला विरोध दर्शविला होता. स्वीडनमधील तुर्कियेविरोधी समुहांवर कारवाई होत नसल्याचा आरोप तेथील सरकारने केला होता. स्वीडनमध्ये कुर्द समुहांना आश्रय मिळत असल्याचे तुर्कियेचे सांगणे आहे.
तुर्कियेतील मुख्य विरोधी पक्षाने देखील नाटोमधील स्वीडनच्या प्रवेशाला समर्थन दर्शविले आहे. परंतु एका उजव्या विचारसरणीच्या पक्षाने स्वीडनला नाटोचे सदस्यत्व प्रदान करण्यास विरोध दर्शविला आहे. तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान यांनी स्वीडनच्या नाटो सदस्यत्वाला समर्थन दिले आहे. अमेरिकेच्या संसदेकडून तुर्कियेच्या 40 नव्या एफ-16 लढाऊ विमानांच्या खरेदीला प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. एर्दोगान यांनी आता कॅनडा तसेच अन्य नाटे सहकाऱ्यांनाही तुर्कियेवरील शस्त्रास्त्र निर्बंध हटविण्याचे आवाहन केले आहे.