प्रेम करणाऱ्यांचे नशीब बदलणारा टनेल ऑफ लव्ह
नवदांपत्य येथे करवितात फोटोशूट
टनेल किंवा भुयाराचे नाव ऐकून अनेकांच्या मनात रोमांच निर्माण होते. परंतु जगात एक टनेल ऑफ लव्ह देखील आहे. प्रत्यक्षात हे भुयार नाही, परंतु रेल्वेचे टनेल अवश्य आहे. हे भुयार घनदाट झाडांच्या आत भुयाराच्या आकारातून जाते. हे युक्रेनच्या रिव्ने भागात क्लेवन शहर आणि ओरजिव गावादरम्यान स्थित ओ. याला प्रेमाचे भुयार म्हणण्याची कहाणी अचानक निर्माण झालेली नाही.
हे स्वत:च्या आकर्षक सौंदर्यामुळे जगभरातील जोडप्यांसाठी एक प्रमुख केंद्र ठरले आहे. एकेकाळी क्वेलन येथून पळून जाणाऱ्या प्रेमींसाठी एक आश्रय स्थळ होते. एक युवा पोलिश इंजिनियर क्लेवन येथील युवतीवर प्रेम करत होता. तो ओरजिव येथे राहत होता. तेथून स्वत:च्या प्रेयसीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने थेट जंगलात एक रेल्वेमार्ग तयार केल्याची देखील वदंता आहे.
तर पारंपरिक वदंतेनुसार या भुयाराची निर्मिती शीतयुद्धातील तणाव आणि गोपनीयतेशी जोडली गेलेली आहे. सोव्हियत काळादरम्यान सैन्य उद्देशांसाठी रेल्वेमार्गांची निर्मिती करण्यात आली होती. युक्रेनियन सैन्याने सैन्य हार्डवेअरची वाहतूक लपविण्यासाठी जाणूनबुजून रेल्वेमार्गाच्या आजूबाजूला वृक्षलागवड केली होती असे मानले जाते. कालौघात सोव्हिएत संघाचे पतन झाले आणि निसर्गाने भुयाराला खरी सुंदरता, एका अनोख्या धनुष्याकृती संरचनेत बदलले आणि जेव्हा ओरजिवमध्ये लाकडाच्या कारखान्यातून एक मालगाडी दरदिनी रेल्वेमार्गावर धावू लागली आणि झाडांच्या फांद्यांना आदळू लागल्यावर याचा आकार आणखीच योग्य झाला.
2011 मध्ये इंटरनेटवर लोकप्रिय होण्यापूर्वीपर्यंत टनेल ऑफ लव्हविषयी लोकांना फारशी माहिती नव्हती. क्लेवनच्या बाहेरील भागात भटकणाऱ्या पर्यटकांच्या एका समुहाने अचानक झाडांमध्ये हरवलेल्या रेल्वेमार्गावर असल्याचे जाणले. त्यांनी याचे एक छायाचित्र काढत ते फेसबुकवर शेअर केले. या घटनेनंतर पत्रकार आणि फोटोग्राफर अमोस चॅपल यांनी या ठिकाणाचा दौरा केला आणि आकर्षक भुयाराविषयी अधिक माहिती शेअर केली. आता हे टनेल ऑफ लव्ह म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.
भुयार आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी अनेक मान्यता आहेत. भुयारात आपल्या प्रेमाला मजबूती मिळेल आणि रेल्वेमार्गावर उभे राहून आलिंगन घेतले तर कधीच ताटातूट होणार नसल्याचे जोडप्यांचे मानणे आहे. तर भुयार नवविवाहितांमध्ये देखील लोकप्रिय आहे. नवविवाहितांकडून येथे विवाहाची छायाचित्रे काढणे पसंत केले जाते.
हा आकर्षक नैसर्गिक रेल्वे भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे असून त्यांच्या फांद्यांनी तो वेढला गेलेला आहे. हे युक्रेनमधील सर्वात लोकप्रिय स्थळ आहे. भुयारात प्रकाश आणि सावल्यांचा खेळ सुरू असतो. याचमुळे फोटोग्राफर या ठिकाणाला अधिक पसंती देतात. त्यांच्याकडून जोडप्यांचे छायाचित्रण येथे केले जात असते.
मनमोहक नैसर्गिक रेल्वेभुयार वर्षभर लोकांसाठी खुले असते. उन्हाळ्यात पर्यटकांसाठी भुयाराला भेट देणे अधिक चांगले असते, त्या काळात भुयार अधिक सुंदर दिसून येते. तेव्हा निसर्ग पानांना हिरव्या रंगापासून सोनेरीपर्यंत विविध रंगांमध्ये बदलत असतो.