महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुळशी विवाहाला प्रारंभ

11:14 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरात बुधवारी तुळशी विवाहाला प्रारंभ झाला. तुळशी विवाहानिमित्त शहर परिसरात विवाहाचे साहित्य दोन दिवसांपूर्वीच दाखल झाले होते. नागरिकांनी घरातील तुळशी वृंदावन रंगवून त्यावर श्री राधा कार्तिक दामोदर प्रसन्न असे लिहून वृंदावनाला फुलांनी सजविले. तसेच बाजूला ऊसही लावले. तुळशी विवाहाचे औचित्य साधून बाजारपेठेत विक्रेत्यांनी तयार तुळशी वृंदावन मांडले होते, त्यांची खरेदीही झाली. विवाहानिमित्त फुलांची आवक वाढली होती. तुळशी विवाहानंतर लग्नसराईची सुरुवात होते. त्यामुळे तुळशी विवाहाला महत्त्व आहे. नागरिकांनी घराच्या अंगणात तसेच टेरेसवर तुळशी विवाह केला. तुळशीला नववधुप्रमाणे हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे अलंकार घालून श्रीकृष्णाच्या मूर्तीसमवेत तिचा विवाह केला. यानंतर महिलांनी परस्परांना हळदी-कुंकू देऊन प्रसाद वाटप केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article